डोंबिवलीच्या महिलेस 6 महिन्याची शिक्षा : सव्वा पाच लाखाचा दंड

 

– मारेगाव न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली शिक्षा

– धनादेश अनादर प्रकरण

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

धनादेश अनादर प्रकरणी मारेगाव येथील न्यायालय न्यायदंडाधिकारी यांनी डोंबिवली जिल्हा ठाणे येथील स्वाती विकास बोबडे यांना सहा महिन्याचा करावास व 5 लाख 20 हजार रुपयाची शिक्षा सुनावली आहे.

वणी येथील प्रविण साधूजी भट यांचे कडून डोंबिवली येथील स्वाती बोबडे यांनी पाच लाख वीस हजार रुपयाची रक्कम हातउसने स्वरूपात घेतली होती. मात्र सदर रक्कम परत न करता धनादेश दिला.सदरील धनादेश पुरेशा रकमे अभावी अनादर झाला.

याबाबत रोख रकमेकरिता वारंवार मागणी करण्यात आली परंतु रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने फिर्यादी भट यांनी न्यायालयात धाव घेत प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.

धनादेश अनादर प्रकरणात उभय बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर व न्यायनिवाड्याचे अवलोकन करून मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश निलेश वासाडे यांनी सौ. स्वाती विकास बोबडे रा. डोंबिवली जिल्हा ठाणे यांना सहा महिन्याचा करावासा व 5 लाख 20 हजार रुपयांच्या नुकसान भरापाईची शिक्षा ठोठावली.वादी तर्फे अँड. परवेज पठाण यांनी बाजू मांडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment