– मारेगाव शहर ‘मनसे’ चा पुढाकार
– अयोध्या राम मंदीर, मूर्ती प्राणप्रतिष्ठानाचे औचित्य
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त मारेगाव येथे पंच कुंडी महायज्ञाचे आयोजन सोमवार दि.22 जानेवारीला ला सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे. तमाम भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन मारेगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
पंचभूताचे महत्व सृष्टीच्या तत्वज्ञानाशी संबंधित असतांना विश्वातील प्रत्येक गोष्ट पाच घटकांनी बनलेली आहे. ही कल्पना संकल्पना, समतोल आणि समरसतेशी जोडलेली आहे.मंदीर आणि विधी मध्ये पंचभूताचा संबंध मानवी शरीरात देखील असतो. एकूणच पंचभूताचा उद्देश विश्वाचे स्वरूप अन मानवी शरीर समजून घेण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करणे आणि व्यक्तींना स्वतः मध्ये समतोल वाढविण्यास मदत करणे हा असतांना राम मंदीर व मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाचे औचित्य साधून पंच कुंडी महायज्ञ चे आयोजन करण्यात आले आहे.
मारेगाव नगरपंचायत कार्यालय समोर असलेल्या हनुमान मंदिरात सोमवार ला सकाळी 9 वाजता आयोजित महायज्ञास तमाम भाविकांनी सहभाग दर्शविण्याचे आवाहन मारेगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष चांद बहादे यांनी केले आहे.