मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व मा. वामनरावजी कासावार, संचालक शेतकरी शिक्षण संस्था, मारेगाव यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 23 जानेवारीला सकाळी ठीक 11:00 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, रक्तदान ही जनसामान्यांची सेवा, यालाच मानूया ईश्वरसेवा हेच ब्रीदवाक्य सार्थ ठरवण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या विचारातून रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. तरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व समस्त कर्मचारी वृंद यांच्यावतीने मारेगाव शहर व परिसरातील तमाम जनतेला आवाहन करण्यात येते की रक्तदान करून सहकार्य करावे.
रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथील टीम उपस्थित राहणार आहे.