मारेगाव तालुका काँग्रेस… मारोती गौरकार यांचेकडे दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा

– पक्ष श्रेष्टीची विश्वासाची मोहोर

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुका कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा मारोती गौरकार यांचे खांद्यावर देण्यात आली. पक्ष श्रेष्टींनी त्यांच्या पक्ष कार्यातील सातत्याची दखल घेत अध्यक्ष पद दुसऱ्यांदा बहाल केले.

 

मारोती गौरकार हे महाविद्यालयीन जगता पासून सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात सातत्य ठेवून अग्रणी कार्य करीत आहे. पक्षाची मोट बांधून युवा वर्गाची मोठी फळी त्यांनी राखून तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस पक्ष आघाडीवर ठेवत पक्ष मजबुतीवरील भर देत मारेगाव तालुक्यात संजीवनी बहाल केली.

 

त्यांच्या सकारात्मक कार्याची दखल घेत पक्ष श्रेष्ठीनी दुसऱ्यांदा गौरकार यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली आहे. आगामी काळातील निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तालुक्यात यापेक्षा अधिक मजबुतीवर भर देण्याचा आशावाद “विदर्भ टाईम्स” शी बोलतांना गौरकार यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, आपल्या निवडीचे श्रेय ते जिल्हा व तालुक्यातील पक्ष श्रेष्टीना देतात. मारोती गौरकार यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment