– ग्रामस्तरावर सामाजिक स्वास्थ बिघडले
– वादविवाद विकोपाला : अंकुश लावण्याची मागणी
मारेगाव : दीपक डोहणे
अवैध व्यवसायाचा तालुका म्हणून नावारूपी येते असलेल्या मारेगाव तालुक्यात सामाजिक स्वास्थ्यास प्रचंड बाधा निर्माण होत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी शिवनाळा येथील महिला मारेगाव पोलीस ठाण्यात सरसावत अवैध व्यवसायासह तळीरामांना आवरण्याची मागणी करण्यात आली.
मारेगाव तालुक्यात अनेक गावात मारेगाव वणी वरून दारूच्या पेट्याची खेप पडल्या जातेय हे नविन नसले तरी यात नवयुवक तरुण, शेतकरी व शेतमजूर झिगंलेल्या अवस्थेत स्वतःसह कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होवून गावातील सामाजिक स्वास्थ्यास तडा निर्माण होत आहे.
दारूच्या व्यसनाने नेहमीच झिगंलेल्या कडून वादविवादाचे रूपांतर मोठ्या वादात होण्याची शक्यता बळावल्याने याला आवर घालून दारू पेट्याची खेप आणणाऱ्या अवैध व्यवसायिकाचा शोध घेवून कठोर कारवाई करण्याची मागणी शिवनाळा येथील रणरागिनींनी पोलिसात केली आहे.अन्यथा आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला.
आज सोमवारला पोलिसात दिलेल्या निवेदनवेळी शशिकला आत्राम, सपना आत्राम, वंदना पिंपरे, शारदा आत्राम, कमला टेकाम, वनिता आत्राम, रामतुला मोरे, रंजना आत्राम, आरती मोरे, निर्मला लोनसावळे यांचेसह अनेकांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करतात याकडे शिवनाळा वासियांचे लक्ष लागले आहे.