– मारेगाव येथील घटना
– ट्रॅव्हल्स पसार
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव जवळील कान्हाळगाव येथून राज्य महामार्गाने दुचाकीने मारेगाव कडे येत असतांना मागावून आलेल्या ट्रॅव्हल्सने धडक देत मारेगावचे तीन युवक गंभीर जखमी केल्याची घटना मारेगाव येथे आज सोमवार ला सायंकाळी सात वाजता जुन्या न्यायालयासमोर राज्य महामार्गांवर घडली. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स अपघातानंतर पसार झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतं आहे.
मारेगाव येथील रवी गेडाम, प्रवीण सोयाम व बाबुलाल बेसरकार हे तिघे दुचाकीने कान्हाळगाव येथून येत असतांना मारेगाव दिशेने निघाले. यवतमाळ येथून येत असलेल्या ट्रॅव्हल्स ने त्यांच्या दुचाकीला धडक देत पसार झाली.
दरम्यान, ट्रॅव्हल्स ची धडक बसताच दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर जखमी अवस्थेत कोसळले. तात्काळ जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमीवर उपचार सुरु आहे.
परिणामी अपघात होताच मानवी संवेदना हरवून ट्रॅव्हल्स चालकाने पसार होण्यात धन्यता मानली. ट्रॅव्हल्स चालकाच्या असंवेदनशील मनाचा सर्वत्र संताप व्यक्त होत असून पोलीस अपघात ग्रस्त ट्रॅव्हल्सचा शोध घेत आहे.