Breaking News

झुरक्यात हरविलेलं गाव… मारेगावात तयार झाल्या सेठ ,सरकार व पट्टा गँग..!

– एकमेकाच्या जिवावर उठण्याची भिती
– गांजाच्या नशेमुळे घडल्या दोन आत्महत्या

मारेगाव – दीपक डोहणे

( अंतिम.. भाग – 3 )

अवघ्या मारेगाव शहरात गांजा ने थैमान घातले आहे.गांजा ओढून ओढून सुजलेल्या डोळ्यात तरुणाईने आता भविष्याचे व आपल्या करिअरचे स्वप्न दिसणे बंद झाले आहे.या डोळ्यात स्वप्ना ऐवजी सुड घेण्याचे लाल रक्त पसरत आहे.

शहरातील तरुणाई आपल्या भविष्याचे काय होईल हा विचार करतांना दिसत नाही आहे. ओयो मध्ये शिरणाऱ्या मुली बेभान झाल्या आहेत.मायबाप लग्न करून देणारच त्यामुळे फिकीर नाही.मौज मजा करून घ्या असे धोरण अनेक चाल बहिकलेल्या मुलींनी ठरविले आहे.

तर दुसरीकडे पोकळ हाडांची नशेखोर मुले आता गँग बनविण्यास लागली आहे.त्या गँग चे ‘ नामकरण ‘ ही झाले आहे.सध्या मारेगावातील पट्टा गँग , सरकार गँग , सेठ गँग आदी गँग ची युवकात मोठी चर्चा सुरू आहे.दोन गँगची मुले नशेमध्ये एकमेकाशी भिडत आहे.हा नवा भेसुळ प्रश्न मारेगावात उभा झाला आहे.

गांजाच्या दलदलीत अडकलेल्या युवकापैकी दोन युवकांनी निराशेच्या गर्तेत जावून आत्महत्या केल्या आहे.शहरात आदिलाबाद , नागपूर , यवतमाळ येथून मोठ्या प्रमाणात गांजाची खेप येत आहे.मात्र पोलीस प्रशासनाला यातील काहीच कसं कळत नाही हा संतप्त प्रश्न शहरवासी विचारत आहे.

एकेकाळी संपूर्ण राज्यात नशेखोरी मुळे पंजाब चा मोठा सत्यानाश झाला होता.मारेगाव देखील “उडता पंजाब” होण्याच्या मार्गाने लागला आहे.गांजा पिऊन बोर झालेली तरुणाई चरस , अफीम , कोकीण सारख्या जीवघेण्या ड्रग्स कडे कधीही वळू शकतात अशी धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

तरुणाई मेली तरी चालेल पण आपल्या धंद्यात अशीच बरकत येत रहावी हा चंग बांधलेल्या अमली पदार्थांचे तस्कर व व्यावसायिक यांच्या मुसक्या वेळीच बांधणे अत्यावश्यक झाले आहे.त्यासाठी मारेगावातील सामाजिक , राजकीय तळमळ जपणाऱ्यांनी आता पुढे सरसावण्याची गरज आहे.

‘ गाव मरो पण आपला खिसा भरो ‘ हे ब्रिद वाक्य घेवून चालणाऱ्या पोलीस प्रशासनास या महाभयंकर सामाजिक प्रश्नाशी काही घेणेदेणे नसल्याने त्यांच्या प्रती सुज्ञ पालकांचा मोठा आक्रोश उफाळून येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment