Breaking News

बोटोणी…. उद्या सत्यवाणीतून सत्यपाल महाराज प्रबोधनाची मेजवानी

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याचे अनावरण

– विराट पंकज साठे जन्मदिवसाचे औचित्य

मारेगाव – विटा न्युज नेटवर्क

तालुक्यातील बोटोणी येथे उद्या रविवार ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनातून प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुरुदेव सेवा मंडळ व पुंडलिकराव साठे यांच्या संयुक्त विद्यमाने विराट पंकज साठे याच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दिवसभर विविधांगी कार्यक्रम आयोजित आहे.

रविवार ला सायंकाळी 4 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व रात्री 7 वाजता प्रख्यात सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित आहे.

सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाधीश निलेश वासाडे यांचे हस्ते होणार असून उपविभागीय अधिकारी नितिन कुमार इंगोले , तहसिलदार नीलावाड , बि.डी.ओ.मडावी , ठाणेदार खंडेराव , वैद्यकीय अधिक्षक डॉ.इंगळे , सरपंच सुनिता जुमनाके, उपसरपंच प्रविण वनकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

परिसरातील तमाम जनतेनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलीकराव साठे यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment