Breaking News

बोटोणी येथे दंडार व कबड्डी स्पर्धेचे आयोजन

– 1 लाख 8 हजाराच्या बक्षिसांची भव्य लूट

– माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.हंसराज अहिर करणार उद्घाटन 

मारेगाव – विटा न्युज नेटवर्क

ग्रामीण भागातील प्रामुख्याने आदिवासी जमातीतील कला उत्सव जोपासण्यासाठी बोटोनी येथे उद्या दि.18 नोव्हेंबर रोजी चौताली व गोंडी दंडार आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत एक लाख आठ हजार रुपये बक्षिसांची भव्य लूट असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने खेलो इंडिया अंतर्गत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव , समाज प्रबोधन व कबड्डी सामन्याचे आयोजन असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन रात्री 9 वाजता मा.हंसराज अहिर यांचे हस्ते तर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , भाजप जिल्हाध्यक्ष ता रेंद्र बोर्डे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.स्पर्धेत सहभागी संघाला प्रोत्साहन बक्षिसासह ग्रामगीता डॉ.अंकुश आगलावे यांचे कडून भेट देणार आहे.

जिल्ह्यातील तमाम स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा किसान मोर्चाचे शंकर लालसरे व मित्र परिवार यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment