– मारेगावची तरुणाई चालली विध्वंसक वाटेवर
मारेगाव – दीपक डोहणे
( भाग -2 )
शहरात गांजाने नशेळी झालेली युवकांची जमात चिंतनाचा विषय ठरत आहे तर दुसरीकडे आजूबाजूच्या शहरात मारेगाव सह तालुक्यातील मुलामुलींची ओयो धमाल आहे.हजार रुपयात तास भरासाठी रूम उपलब्ध करून देणारे काही हॉटेल उघडण्यात आले आहे.त्यामुळे मारेगावच्या अनेक शाळा , महाविद्यालयात शिकणारे तरुण मुलं मुली तासभरासाठी या हॉटेलात जावून आपले मनोरंजन उरकवून घेत आहे.
आपली बबली अन् बंट्या शिकून राहिले याचा अभिमान ठेवणाऱ्या अनेक पालकांच्या नजरेआड बंटी बबलीची ओयो वाली धमाल बेधडक सुरू आहे.या हॉटेल चे रजिस्टर्ड तपासले तर कित्येक बंटी बबली यांची नावे पाहून पायाखालची वाळू सरकल्या शिवाय राहणार नाही.
विशेष म्हणजे रोजमजुरी करून काबाडकष्ट उपसून मुलामुलींना कॉलेजमध्ये पाठविणारे मायबाप या भयाण वास्तव्यापासून पुर्णतः कोसो दूर आहे.अचानक मुलीचा मोबाईल , मेकअप व कपडे मध्ये झालेला बदल पालकांना कळू नये ही मोठी सामाजिक चिंतनाची बाब मारेगाव करांणसाठी चिंतनाची बाब ठरत आहे.
अलीकडेच शहरात गर्भनिरोधक गोळ्या व सरकारी फुग्यांच्या विक्रीत कमालीची व धक्कादायक वाढ झाल्याची एका व्यावसायिकाने ‘विटा’ शी बोलतांना सांगितले आहे.सुसाट पळणारी वाहने , गालफट बसलेले तरुण व भडक कपड्यातील तरुणी गांजाचा सुळसुळाट व ओयोवाली धमाल हा मोठा गंभीर प्रश्न मारेगाव शहरासह ग्रामीण भागात फोफावला आहे.
या गंभीर बाबींवर पोलीस अधीक्षकांनी ‘नशा मुक्त पहाट’ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात अभियान राबविले आहे.परंतु शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री करून लाखो रू.ची उलाढाल होत आहे.तरुणाईला बरबाद करणारे हे गांजा विक्रेत्यामध्ये काही कर्मचाऱ्यांचे मुले , एका राजकीय महिलेचा मस्तवाल मुलगा , ब्लॅक डायमंड गावातून आलेला भाईगिरी , घोंसा रोड वरील प्रभागातील टपोरी युवक हे लोक या धंद्यात गुंतले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
ही माहिती तरुणांना असतांना पोलिसांना मात्र यातील काहीच माहीत नाही.हे येथे आश्चर्यकारक असून कोणत्याही गांजा विक्रेत्या विरोधात पोलिसांनी फारशी कारवाई केल्याचे रेकॉर्डवर दिसत नाही.पोलिसांच्या या साखरझोपेमुळे नशेखोरीच्या धद्यात उड्या घेतलेले मस्त गब्बर होत आहे व तरुणाईच्या छातीचे पिंजरे दिवसेंदिवस खिळखिळे होत आहे.
( उद्या वाचा – मारेगावात तयार झाल्या सेठ – सरकार व पट्टा गँग )