– मिसरूड फुटलेली तरुणाई नशेखोरीत
– मायबाप साखरझोपेत
मारेगाव – दीपक डोहणे
(भाग -1)
एकेकाळी शांत व सुसंस्कृत असलेलं मारेगाव.आता या गावची नविन ओळख होत आहे.गांजा ओढणारी नशेली नवतरुणाईची फौज गावाबाहेर झुरके मारत आहे.आणि या भयाण वास्तवाची त्यांच्या आईवडिलांना कवडीची भणक लागत नाही आहे.हे चित्र अवघ्या शहरात व काही गाव खेड्यात देखील पसरल्याची भयावह धक्कादायक माहिती आहे.
गत वर्षभरापासून मारेगाव शहरात गांजा पिणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.विशेष म्हणजे यात आठवी वर्गा पासून ते कॉलेज कुमारांची संख्या अत्याधिक चिंताजनक आहे.
शंभर रुपयांत शहरात सहजतेने गांजा पुडी मिळते आहे.खिशात पुडी अन् मनगटात गाडी घेवून मिसरूड फुटलेली तरुणाई सुसाट गाडी चालवत गांजाचे झुरके मारायला टोळ क्या टोळक्या ने सूनसान जागी बसत आहे.आणि आपला मुलगा दिवसभर जातो कुठे अन् करतोय काय यावर लक्ष न ठेवणारे मायबाप साखरझोपेत आहे.
पालक अनभिज्ञ असल्याने ही कोवळी तरुणाई छातीचा पिंजरा खिळखिळा होत पर्यंत रोज दोन ते तीन वेळा गांजाच्या धुक्यात हरवून जात आहे.मोबाईल वाली माय अन् बार मधला बाप हे दोघंही आपल्याच विश्वात गुंतल्याने मुलांनीही आपल्यासाठी वेगळी धुक्याची दुनिया शोधून घेतली आहे.मारेगाव शहरात जवळपास दोनशे ते तीनशे कोवळी मुल या गांजाच्या मायाजाल मध्ये कमालीची गुरफटून गेली आहे.
शहरातील वणी कडे जाणाऱ्या राज्यमहामार्गावरील काही निवडक पान टपरीवर छुप्या मार्गाने गांजाची विक्री केल्या जात असल्याची माहिती आहे.येथूनच माचिस , सिगरेट व गांजाचे पार्सल घेवून ही नशेली मुले गावाबाहेरच्या निर्जन लेआऊट मध्ये पडक्या इमारतीत पॉवर हाऊस च्या पुढील नवरगाव कॅनल वर ‘ दम मारो दम ‘ म्हणत बेभान होवून झुरके मारत आहे.सामाजिक स्वास्थ्यासाठी हा मोठा गंभीर प्रश्न मारेगावात निर्माण झाला आहे.
(उद्या वाचा – ओयों वाली कमाल..मुलं मुली धमाल ! )