Breaking News

माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रती अशीही ‘निष्ठा’

– शाळेला संगणक संच भेट

मारेगाव | कैलास ठेंगणे 

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक संच भेट देत दिवाळी साजरी केली. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी निष्ठा उजागर केल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.

एकोणविसाव्या शतकात जिल्हा परिषदेच्या शाळेचे वैभव फार मोठे होते. या शाळातील किलबिलाटात छडी लागे छम छम, विद्या ये घमघम चा आवाज कानात गेला की विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग सुलभ व्हायचा. याच किलबिलाटातून लाखो विद्यार्थी घडले. नुसतेच घडले नाही तर उच्च पदावर आरूढ झाले. मात्र खाजगी शाळांच्या आक्रमणामुळे जिल्हा परिषद शाळाची वाट गंभीर झाली. शाळात पटसंख्या दिवसा गणित घटक असल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खडबड उडाली. त्यामुळे शासन स्तरावर जिल्हा परिषदेच्या शाळा चे वैभव परत मिळविण्याकरिता विविध योजना आखल्या गेल्या व जात आहे. शासन सहकार्य करतेस पण ज्या शाळेमुळे आपण घडलो त्या शाळेत प्रती आपली निष्ठा असावी याकरिता माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढे आल्यास जिल्हा परिषद शाळेत चे जुने वैभव प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील कोसारा शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलत शाळेला संगणक संच भेट दिली. त्यामुळे अध्यापन प्रभावी, रंजक व अर्थपूर्ण होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ विद्यार्थ्यांची दूरदृष्टी वाढणार आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने माजी विद्यार्थी श्रावण कुत्तरमारे , प्रकाश राऊत, अक्षय चांभारे, सचिन चांभारे, मोहन लांडगे ,दिलीप येडमे, प्रकाश पचारे, नामदेव कनाके, साईनाथ कनाके ,सागर खडसे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक कविता राऊत ,सरपंच खाडे, उपसरपंच सचिन पचारे, शिक्षक वेनूश्याम बाभळे,शितल मांढरे ,काजल येडमे सह आदी उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment