Breaking News

सामाजिक जाणिवेतून व्हीलचेअरचे दातृत्व

– मारेगाव रुग्णालयाला शंकर मडावी यांचेकडून ब्लँकेट ही भेट

– अनेक उपक्रमात सहभाग

   मारेगाव: विटा न्युज नेटवर्क 

येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार तथा स्विकृत नगरसेवक शंकरराव मडावी यांच्या अर्धांगिनी रत्नमाला मडावी यांचे स्मृती प्रित्यर्थ सामाजिक जाणिवेतून रुग्णसेवेचे दातृत्व पुढे सरसावले आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात लक्ष्मीपूजन दिवसाला मडावी यांनी मारेगाव ग्रामीण रूग्णालयाला 30 ब्लँकेट सह व्हीलचेअर भेट दिली.

मारेगाव तालुका हा सर्वच बाबतीत पिछाडीवर आहे.वंचितांच्या समस्या मनात घेण्यात किंव्हा बघण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही.येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार शंकरराव मडावी यांना सामाजिक ओढ स्वस्थ बसू देत नाही.

मडावी कुटुंब दरवर्षी दिवाळीला कोलाम समाजाच्या पाड्यावर जावून दातृत्व स्वीकारत भेट वस्तू देत वंचिता समवेत दिवाळी साजरी करतात.मात्र यंदा 30 ऑक्टोंबर ला शंकरराव मडावी यांच्या पत्नी रत्नमाला यांचं निधन झाल्याने त्यांचे हात रुग्णालयाकडे सरसावले.

दरम्यान , याप्रसंगी शंकरराव मडावी यांचे समवेत वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुभाष इंगळे , परिचारिका जयश्री इंगोले , निखिल कुडमेथे, अविनाश आत्राम , पंकज साठे आदींची उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment