– ऐन दिवाळीच्या पर्वावर टोकाच्या निर्णयाने हळहळ
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाड्याने असलेल्या एका कुटुंबातील युवकाने पंख्याला गळफास घेतल्याची दुर्देवी घटना ऐन लक्ष्मीपूजन दिनाच्या पर्वावर संध्याकाळी ८ वाजता घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सैफ अली मनसुर अली सय्यद (२०) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.प्रभागातील एका युवका सोबत त्याचा वाद होवून यातूनच त्याने घरी येवून गळफास घेतल्याची तक्रार मृतकाच्या आईने पोलिसात दिली.
दरम्यान , घटनेच्या वेळी व्यवसायाने टेलर्स असलेले वडील बाहेर होते तर आई ही घराबाहेर बसलेली होती.ही संधी साधत सैफ अली हा घरात गेला आणि पंख्याच्या सहाय्याला ओढणी बांधून गळफास घेतला यातच त्याचा मृत्यू झाला.
दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत असतांना या अघटीत घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.