Breaking News

डॉ.महेंद्र लोढा यांची सामाजिक बांधिलकी… कोलाम पोडावर जावून साजरी केली आगळी वेगळी दिवाळी

महिलांना साडीचोळी तर बालकांना फटाके वाटप

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

आदिवासी बहुल भागातील झरी जामनी परिसरातील वर पाड्यावर जावून वणी उपविभागात सदैव सामाजिक बांधिलकी जपणारे महामेरू डॉ.महेंद्र लोढा येथील कोलाम कुटुंबा समवेत दिवाळीचा फराळ , महिलांना साडी चोळी व बालकांना फटाके वाटप करीत फराळाचा आस्वाद घेतला.

एक आगळी वेगळी दिवाळी सण सामाजिक बांधिलकी जपणारे व वणी उपविभागात अग्रणी व्यक्तिमत्त्व डॉ.महेंद्र लोढा यांनी झरी या आदिवासी भागातील वर पाड्यावर जावून कोलाम बांधवासमवेत साजरा केला.

यावेळी कोलाम बांधवांनी गोर गरीबांचे नाथ मानले जाणारे डॉ.महेंद्र लोढा यांचे शतशः आभार मानत आणि या मांगल्याचा महत्त्वपूर्ण सणाला आमच्या छोट्याश्या वस्तीत प्रकाशमय उजाळा दिल्याच्या भावना प्रतीपादीत केल्या.

 

डॉ.महेंद्र लोढा यांचे सामाजिक कार्य उपविभागात भरीव असतांना त्यांचे सामाजिक उपक्रम हे गळ्यातील ताईत बनून असते.आर्थिक मदत , आत्महत्या ग्रस्त कुटुंबीयांना शासनाची मदत, गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना मोफत उपचार , वेळोवेळी गरजूंना सहकाऱ्यांची भूमिका यामुळे डॉ.लोढा हे उपविभागात कैवारी म्हणून प्रचलित आहे.

दिवाळीच्या महापर्वावर लाखो रुपयांचे फटाके आकाशात उडतात.मात्र अनाथ , गरीब , कोलाम , पारधी पाड्यावर अविकसित मुले मुली यांच्या हृदयात खरा देव असते अशा विचारसरणीतूनच ऐन दिवाळी दिवसाला कोलाम समाजाच्या वस्तीत जावून डॉ.लोढा यांनी भरगच्च फराळ , साडीचोळी व फटाके वाटप करीत सामाजिक संवेदनाचा परिचय अधोरेखित केला.यावेळी ओम ठाकूर , अफसर भाई यांची उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment