▪️ वणी आगार व्यवस्थापकांना निवेदन
मारेगाव: विटा न्युज नेटवर्क
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने नियमित बस सेवा सुरू करण्याच्या मागणी साठी आज वणी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांना मनसे मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
शाळा-महाविद्यालयांच्या वेळेवर अनेक मार्गावर बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो ही बाब मनसे वारंवार निदर्शनास आणून देत असते. तर वणी तालुक्यातील विवीध मार्गावर विद्यार्थांच्या गैरसोयी टाळण्यासाठी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी अनेक बस फेऱ्या सुरू करुन दिल्या. मारेगाव तालुक्यातील मार्डी व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वेळेवर बस सेवा सुरू करण्याची गरज पालकांकडून व्यक्त करण्यात येत होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव तालुक्याच्या वतीने वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांनी आज आगार व्यवस्थापक अभिजित कोरटक यांची भेट घेत याविषयी सविस्तर चर्चा केली. तर मार्डी ते मारेगाव ही बस फेरी शाळेच्या वेळेवर सूरू करा अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत परिवहन महामंडळाकडून ही बस तात्काळ चालू करण्यात येईल यावेळी मनसेला आश्वस्त केले. या प्रसंगी मनसेचे अजिद शेख, उदय खिरटकर,अनंता जुमडे, गणेश क्षीरसागर, रोहित हस्ते, शुभम दाते आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी अन्य महाराष्ट्र सैनिक व शाळकरी विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते .