– गावकऱ्यांनी तथाकथितांना डावलले
– ग्रामपातळीवर जल्लोष
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील पाच ग्रामपचायतीच्या सार्वत्रिक निडणुकीनंतर सोमवार ला निकाल जाहीर करण्यात आला.यात गावपातळीवर गटाचे वर्चस्व सिद्ध करत पाच महिलांच्या हातात गावातील सूत्रे बहाल करण्यात आली.तहसील कार्यालयात निवडणुक निकालानंतर गुलाल उधळीत एकच जल्लोष करण्यात आला.
दरम्यान , गोंडबुरांडा येथील लता शशिकांत उईके , म्हैसदोडका – ललिता मारोती तुरानकर, हटवांजरी – प्रिया गणेश कुडमेथे, घोडदरा – सुनंदा अशोक आत्राम , खडकी बुरांडा – रंगुबाई दादाराव आत्राम यांचेकडे गावकऱ्यांनी प्रथम नागरिक होण्याचा बहुमान प्रदान केला.
पाच ग्रामपंचातच्या निवडणुका पक्षीय किव्हा चिन्हावर लढविल्या गेल्या नसल्या तरीही येथील राजकीय पक्षांनी आमच्या पदरी यश प्राप्त झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ग्राम पातळीवर नवख्यांना संधी देण्यात आली असून तथाकथित पुढाऱ्यांना सपशेल नाकारण्यात आल्याचे चित्र आहे.गाव पातळीवरील पॅनलने ही निवडणुक अस्तित्वाची करून आगामी काळातील निवडणुकीची रंगीत तालीम अधोरेखित करणार असल्याचे बोलले जात आहे.पाच ही गावातील पुढारी सह कार्यकर्त्यांनी आपल्या विजयी श्री चा गुलाल उधळीत जल्लोष साजरा केला.