Breaking News

श्वानांचा पुन्हा उद्रेक… भटक्या कुत्र्याने चार वर्षीय बालकास ओरबडले

– प्राणीमात्राची दया मानवाच्या जीवावर
– मारेगावकरांची ‘भीक नको पण कुत्रा आवर’ स्थिती

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास प्रशासन आता पुर्णतः हतबल झाले आहे.किंबहुना चार दिवसांपूर्वी मोकाट श्वानांची महिला बळी ठरल्या नंतर मारेगाव प्रभाग 13 मधील रविवार ला चार वर्षीय बालकास ओरबडल्याने प्रचंड भिती व दहशत पसरली आहे.

मारेगाव येथे भटक्या कुत्र्यांचा बेसुमार आकडा वाढत आहे.नानाविध आजाराने पछाडलेले श्वान आता मानवासाठी धोकादायक ठरत आहे.पादचारी रस्त्याने जाऊ शकत नाही एवढी दहशत या कुत्र्यांनी वाढविली आहे .यावर नियंत्रण किव्हा श्वानांचा बंदोबस्त करण्यास सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची आडकाठी ठरत असल्याचे प्रशासन सांगत असले तरी प्राणीमात्राची दया करणे आता येथील नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.

परिणामी , येथील प्रभाग क्रमांक 17 मधील श्वानांने माय लेकीवर हल्ला चढविला यात माया गेडाम नामक महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याने शहरात प्रचंड दहशतीचे सावट आहे.

दरम्यान , प्रभाग क्रमांक 13 मधील घराशेजारी खेळत असलेल्या कबीर महेमुद खॉंन या चार वर्षीय बालकाच्या पायाला भटक्या श्वानाने ओरबडले.काही अंतरावर नागरिक उभे असतांना आरडाओरड केल्याने चावा घेण्याचा अनर्थ टळला.

शहरात प्रचंड दहशत माजविणाऱ्या भटक्या श्वानांचा प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करून भविष्यातील मानवावर होत असल्याचा संभाव्य धोका टाळावा अशी नागरिकांची मागणी असली तरी भीक नको पण आता कुत्रा आवर अशी मारेगावकरांची स्थिती झाली आहे.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून निविदा काढण्यात आल्या मात्र दुर्देवाने हे काम घेण्यास कोणीही धजावत नाही आहे.भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून नियंत्रण मिळू शकते.सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने काही तांत्रिक अडचणी प्रशासनासमोर असल्याने श्वानांचा हैदोस वाढतो आहे.यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याकरिता सामुहीक निर्णयाने तोडगा काढण्याचा मनोदय आहे

अरुण भगत
प्रभारी मुख्याधिकारी
नगरपंचायत कार्यालय मारेगाव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment