Breaking News

अखेर संशयास्पद मृत्यूचे पोलिसात बयाण

– अपघाताचा बनाव : घातपाताची साशंकता
– सालेभट्टी येथील शेतीच्या वादातून कट रचल्याचा आरोप

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

वडिलोपार्जित असलेल्या शेतीचा हिस्सा प्राप्त करण्यासाठी न्यायप्रविष्ठ प्रकरण सुरू असतांना प्रतिवादीकडून नेहमीच जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप करीत अपघाताचा बनाव करून हत्या केल्याचा आरोप मृतक गोविंदा कोरझरे यांच्या पत्नीने केला आहे.तशा आशयाचे बयान मारेगाव पोलिसात नोंदविण्यात आल्याने उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त होताच या मृत्यू प्रकरणाचे गूढ उकलणार आहे.

प्राप्त माहितीनुसार , गोविंदा नागोजी कोरझरे रा.मारेगाव यांच्या पत्नीचे वडिलोपार्जित शेती सालेभट्टी ता. मारेगाव येथे आहे.या शेतीचा हिस्सा प्राप्त करण्यासाठी भावाकडे तगादा लावला मात्र शेतीची वाटणी करण्यास सपशेल नकार दिल्याने बहीण चंद्रकला हिने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.शेती प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना गोविंदा व चंद्रकला यांना सातत्याने जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा चंद्रकला हिचा आरोप आहे.

दरम्यान , मागील 16 सप्टेंबर रोजी गोविंदा हे सालेभट्टी येथून दुचाकीने मारेगावकडे निघाले असता सालेभट्टी मांगरूळ रस्त्यालगत रात्री संशायितरित्या निपचित पडून दुचाकी शेजारी पडून होती.अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असतांना गोविंदा यांची प्रकृती खालावत त्यांचा शुक्रवारला रात्री 11 वाजता सावंगी मेघे रुग्णालयात मृत्यू झाला.परिणामी गोविंदा यांचा मृत्यू अकस्मात किव्हा अपघात नसून घातपात असल्याचा मृतकाच्या नातेवाईकांचा आरोप आहे.पोलिसात दिलेल्या बयाणात मुख्य आरोपीसह तिघे कट रचण्यात सहभाग असल्याचे नमूद आहे.शवविच्छेदन अहवालात नेमके काय ? यावरूनच प्रकरणाची दिशा व मृत्यूचे रहस्य उलगडणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment