– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य
– आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते उद्घाटन
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शुक्रवार ला करण्यात आले.
सदर शिबिराचे उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुभाष इंगळे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे , भाजप चे ज्येष्ठ नेते दिनकर पावडे , विजय पिदूरकर , ज्ञानेश्वर चिकटे , शंकर लालसरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सेवा पंधरवाडाची भूमिका आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विषद केली.शेकडो नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेत शुगर , बीपी , एचबी , सिकलसेल , गरोदर माता तपासणी , टीबी. , कुष्ठरोग , लिव्हर , किडणी , स्रि रोग सह डेंगू , मलेरिया ची तपासणी करवून घेतली.शिबिराचे प्रास्ताविक डॉ.इंगळे यांनी केले.
दरम्यान , शिबिरा करिता येथील कर्मचारी सह नगरसेवक तथा भाजप पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला.