– मुलीलाही घेतला चावा
– मारेगाव नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष ठरले कारणीभूत : सर्वत्र संताप
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव येथे मोकाट श्वानांचा वावर मागील अनेक वर्षांपासून असतांना मोकाट कुत्र्याने प्रभाग क्रमांक 17 येथील माय लेकीस चावा घेवून महिलेचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या तकलादू कारभाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.माया सुखदेव गेडाम (40) असे कुत्र्याने चावा घेवून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
मारेगाव येथील मोकाट कुऱ्यांचा कळप बघाल तिथे नजरेत दिसणे नविन नाही.नव्हेतर काही महिन्यांपूर्वी मध्यरात्री चक्क वाहनातून 30 ते 40 मोकाट कुत्रे मारेगावात सोडण्यात आले होते.मात्र यावर बंदोबस्त करण्यात येथील प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याने नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.
परिणामी ,प्रभाग क्रमांक 17 मध्ये वास्तव्यात असलेल्या गेडाम कुटूंबातील आई माया व मुलगी पायल (16 ) यांना मोकाट कुत्र्याने पाच दिवसांपूर्वी चावा घेतला.दोघींचा उपचार झाल्यानंतर दोन दिवसात माया गेडाम यांची प्रकृती खालावली.लगेच चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने नागपूर येथे हलविण्यात आले.येथे माया यांचेवर उपचार सुरू असतांना आज मंगळवार ला पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान मुलगी पायल हिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
प्रशासनाने मोकाट श्वानांचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या प्रसंगावर उपचार करावा अशी सर्वत्र मागणी समोर येत आहे.