– मस्तकावर बंदूक लावीत ठेकेदाराला मागितली खंडणी
– यवतमाळ आरोपीस मारेगावात बेड्या
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
परिसरातील शासकीय वाळू डेपोच्या ठेकेदाराला बंदुकीचा धाक दाखवीत पाच लाखाची खंडणी व दोन लाख रुपये हप्ता मागितल्याची खळबळजनक घटना १३रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. वाळू डेपो ठेकेदाराने मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून आर्म अॅक्ट विविध कलमान्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली.
मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर कोसारा हा एकमेव शासकीय वाळूघाट सुरू आहे. सदर वाळू घाट यवतमाळ येथील बिलाल ट्रेडर्स संचालक सय्यद मन्सूर सय्यद दाऊद यांनी घेतला आहे. या वाळू घाटातील शासकीय नियमाप्रमाणे घरकुल लाभार्थ्यासह गोरगरिबांना वाळू वितरित केली जात असतांना यवतमाळ येथील ललित गजभिये व त्यांचे मित्र यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे अवैध रेती उपसा व वाहतुकीबाबत तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची सखोल चौकशी सुरू असताना १३ सप्टेंबर रोजी संशायित आरोपी व त्यांचे मित्र वाळू डेपो वर गेले. यावेळी फिर्यादी व त्याचे कर्मचारी वाळू डेपोवर हजर होते. यावेळी आरोपीने फिर्यादीला जवळ बोलवत मी व माझ्या मित्राने तुझ्या वाळू घाटाची जिल्हाधिकारी कडे तक्रार केली आहे. सदर तक्रार मागे घ्यायची असेल तर पाच लाख रुपये द्यावे व दोन लाख रुपये हप्ता नियमित हवा. असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या डोक्याला बंदूक लावली तर दुसऱ्याने अनोळखी आरोपीने चाकू धाक दाखविला.या घटनेने प्रचंड थरार निर्माण होत
फिर्यादीने आरडाओरड केल्याने घाटावरील कर्मचारी धावत आले. कर्मचाऱ्यांनी पैसे देण्याचे मान्य करीत फिर्यादीची कशीबशी सुटका करून घेतली. त्यामुळे आरोपींनी घटनास्थळावरून गेले.
प्रचंड दहशतीच्या सावटात आलेल्या सय्यद मन्सूर सय्यद दाऊद यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत घटनेची फिर्याद दाखल केली. तक्रारीवरून विविध कलमासह आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करत आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव ,पोलीस उपनिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावत, जमादार राजु टेकाम करीत आहे.