Breaking News

संशयास्पद… मांगली शिवारात शेतमजुराचा मृतदेह आढळला

– डोक्याला जबर घाव
– उलटसुलट चर्चेला उधाण

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरातील मांगली गावाच्या रस्त्यालगत शेतमजुराचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सदर वृद्ध शेतमजुराच्या डोक्यावर गंभीर इजा असल्याने उलटसुलट चर्चेला कमालीचे उधाण आले आहे.मृतदेह आढळलेल्या इसमाच्या डोक्याला खोलवर रक्तबंबाळ जखम असल्याने वेगवेगळे तर्कही लावल्या जात असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन नंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान , कुंभा येथील बाळू पांढरे या शेतकऱ्याचे शेत मांगली रस्त्यालगत आहे. या शेतकऱ्याच्या शेतात रोजंदारीने काम करण्याकरिता मारोती शेंद्रे वय 65 रा. कुंभा हा शेतकामासाठी गेला होता.शेतात काम करतांना दुपारच्या सुमारास अनेकांना तो निदर्शनास आला मात्र काही वेळातच रस्त्यालगत असलेल्या शेतातील बांधावर त्याचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे.

परिणामी , पोलीस अधिकारी तथा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह मारेगाव रुग्णालयात आणण्याची प्रक्रिया सुरू होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment