Breaking News

आरोप… चिंचमंडळ ग्रा.पं.भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी

– ग्रामपंचायत सदस्यांनी थोपटले दंड
– उपोषणाचा इशारा : वरिष्ठांकडे तक्रार

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

ग्राम विकासाची आगगाडी समजल्या जाणाऱ्या मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांच्या विकास निधीची अफरातफर संगनमताने झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला असून याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनात करीत उपोषणाचा ईशारा दिला आहे.मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील ग्रामपंचायतचा बोथट कारभार सचिवाशी सलगी वाढवित अवघे दोन जन चालवित आहे.कोणत्याही मिटिंगची नोटीस न पाठविता कागदोपत्री मिटिंग दाखवित आहे.वेगवेगळ्या निधीचा परस्पर विल्हेवाट लावीत विकास कामाचा तोरा हुकूमशाहीने चालविली जात आहे.परस्पर हडप करण्यात आलेल्या निधीत संरक्षण भिंती , घर कराचे लाखो रुपये ,15 व्या वित्त आयोगाचे 14 लाख रुपयाचा निधीचा समावेश असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य कविता भास्कर पालकर , अर्चना वामन चटकी , वैभव सोनटक्के , भाग्यश्री सातपुते , नामदेव नान्हे , वंदना सुरेश दानव यांनी केला आहे.

दरम्यान , सदस्यांचा वारंवार अवमान करणे , नोटीस न देता निधीचा परस्पर विल्हेवाट करणे , तक्रारीची चौकशी न करणे , केवळ दोन सदस्यांची संमती घेवून खाते उघडणे , कागदपत्रांची हेराफेरी करणे , ग्रा.पं.एजन्सी असतांना बिरागरीतील लोकांना कामे देत बोगस कामे करणे आदी अनेक आरोपांनी ही ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

चक्क बिडीओ च्या निर्देशाला केराची टोपली

तक्रारीची गंभीरता लक्षात घेता गटविकास अधिकारी यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.मात्र या आदेशाला संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल सादर न करता केराची टोपली दाखविली आहे.या भ्रष्टाचारात कोणाचे किती पाय खोलात गेले याचा अंदाज वर्तविण्यात येत असतांना सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करिता आंदोलनाची धग पेटविण्यासाठी प्रशासनाने सदस्या सह गावकऱ्यांवर वेळ आणून ठेवल्याने हे भ्रष्टाचाराचे कुरण कोणते वळण घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment