Breaking News

मारेगावात वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ इंगळे यांची वर्णी

– ग्रामिण रुग्णालयाची प्रकृती सुधारण्याची अपेक्षा बळावली

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

जम्बो खाटांचा व कर्मचाऱ्यांचा असलेल्या मारेगाव ग्रामिण रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक म्हणून डॉ.सुभाष इंगळे हे आज गुरुवारला रुजू झाले.त्यांच्या वर्णीने शिस्त , पारदर्शकता व बहुचर्चित ग्रामीण रुग्णालयाची प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता बळावली आहे.

डॉ. इंगळे यांनी यापूर्वी मारेगाव ग्रामिण रुग्णालयाचा प्रभारी वैद्यकीय अधिक्षक पदाचा पदभार सांभाळला होता.त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण रुग्णालयाचे रुपडे पालटले होते.यात प्रवेशद्वार , रुग्णांच्या नातेवाईकां करिता प्रतीक्षालय , रंगरंगोटी , रुग्णालय सभोवताल वृक्ष लागवड , प्रत्येक विभागाला स्वतंत्र कक्ष सह कर्मचाऱ्यात प्रशासकीय शिस्तीचाही पगडा अधोरेखित केला होता.

दरम्यान , मारेगाव ग्रामिण रुग्णालयात उपचाराकरिता ग्रामीण भागातील रुग्णांची सतत वर्दळ असते.रुग्ण व नातेवाईक अनेक अडचणींचा सामना करीत असतांना तूर्तास रुग्णालयात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे , एक्सरे ची व्यवस्था सह लॅब सुरू करण्याचा मनोदय नवनियुक्त वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुभाष इंगळे यांनी ‘विदर्भ टाईम्स’ शी बोलतांना व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment