Breaking News

मारेगावातील वास्तव… बसस्थानकाचा बागुलबुवा प्रवाशांच्या माथी

मंत्रालयात लालफितीत अडकला निधीचा प्रस्ताव
– निवारा अभावी प्रवाशांची परवड
– जागा बदलली पण सुविधा शून्य

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

निवडक राजकीय पक्षांनी मारेगाव येथे बसस्थानक उभारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.त्यानुसार बसथांबा ची जागा परिवर्तीत झाली मात्र बदल झालेल्या स्थळी शून्य सुविधा मुळे प्रवाशांची कमालीची परवड होत आहे.प्रवाशांच्या मूलभूत गरजा पूर्णत्वास नेण्यास प्रशासनासह लोकप्रतिनिधी सपशेल नापास झाल्याचे वास्तव आहे.

मारेगाव येथे प्रवाशांची गैरसोय हे नित्याचाच खेळ आजतागायत कायम आहे.यापूर्वी 90 च्या दशकातील मारेगावचा प्रवासी निवारा महामंडळाने जमीनदोस्त करीत अतिक्रमण धारकांना ही जागा सहजसोपी करून देण्यात भलाई समजली.प्रवाशी उन्ह वारा पावसात पानटपरी , हॉटेल चा आसरा घेत एसटी ची प्रतीक्षा करीत चाचपडत राहायचे.

प्रवाशांची परवड लक्षात घेता काही राजकीय पदाधिकारी व पक्षांनी कागदी घोडे नाचवित आंदोलन छेडले.यातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेची तरतूद करण्यात आली किंबहूना बसस्थानक उभारण्याचे नियोजन करण्यात आले.परिवहन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला मात्र आजतागायत निधीची उपलब्धता झाली नसल्याने बसस्थानकचा प्रश्न केवळ चर्चेच्या घिरट्या घालत आहे.

दरम्यान , राज्य महामार्गालगत असलेल्या जागेसमोर बस थांबा ठेवण्यात आला.प्रवाशांचा गैरसोय चा प्रश्न येथे आवासून उभा आहे.किमान एक तास एसटी ची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना प्रवासी निवारा , प्रसाधन गृह नसल्याने व भर पावसात पुरती तारांबळ उडते आहे.त्यामुळे बसस्थानकाचा बागुलबुवा प्रवाशांच्या माथी पडत प्रवाशांची होत असलेली परवड ने सर्वत्र महामंडळ व लोकप्रतिनिधी सह प्रशासनाप्रती संतापाची लाट उसळत आहे.

बसस्थानकच्या नियोजित जागेवर प्रवाशांना मूलभूत सुविधा प्रदान करण्यास सकारात्मक विचार आहे मात्र परिवहन महामंडळाकडून कोणताही पत्र व्यवहार नसल्याने नगरपंचायत प्रशासनास ठोस पावले उचलण्यास तांत्रिक अडचण आहे.
अरुण भगत
प्रभारी मुख्याधिकारी
नगरपंचायत , मारेगाव

“मारेगाव बसस्थानक निर्मिती करिता परिवहन महामंडळाच्या वतीने शासन निधी मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून मागविला आहे.तात्काळ निधी उपलब्ध करण्यासाठी जनसंपर्क विभागीय कार्यालयाकडून पाठपुरवठ्याचे सातत्य कायम आहे.निधी मंजूर होताच बांधकाम गतिमान होईल.मात्र नेमके कधी ? याबाबत सांशकताही आहे.सा.बां. विभागाद्वारे खनिज विकास निधी मार्फत निधी ची मागणी करण्यात आली तूर्तास निधी प्रस्ताव मंत्रालयात लालफितीत अडकला आहे.”

बसस्थानक उभारणीत निधी ला वाजवीपेक्षा जास्त विलंब होत असेल तर पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल. प्रवाशांना मूलभूत गरजेची पूर्तता होत नसेल तर हे दुर्देव. मंत्रालयात खितपत पडलेला प्रस्ताव आमदार महोदयांनी पुढे सरकवत प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी अपेक्षा आहे
बंडू गोलर
जिल्हा सरचिटणीस , भारतीय कम्युनिस्ट पक्ष , यवतमाळ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment