Breaking News

आत्महत्येची धग… तणनाशक ग्रहण केलेल्या शेतकऱ्याचा दहा दिवसानंतर मृत्यू

– मारेगाव तालुक्यातील शिवनाळा येथील घटना
– कर्जापायी कवटाळले मृत्यूला

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

अल्पभूधारक शेतकरी असलेल्या शिवनाळा (तेलाई पोड) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने तणनाशक विष ग्रहण करीत इहलोकाची यात्रा केली. केशव हनगु रामपुरे (50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

केशव रामपुरे यांचेकडे पाच एकर पेक्षा कमी शेती आहे.यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतांना निसर्गाचा लहरीपणा व सातत्याने अत्यल्प उत्पादन यामुळे केशव च्या शिरावर लाखो रुपयांचे कर्ज होते.

कर्जाने पछाडलेले केशव मागील काही दिवसांपासून विवंचनेत होते.अशातच दहा दिवसांपूर्वी त्यांनी स्वगृही आइसिकपॉवर नामक तणनाशक ग्रहण केले.त्यांना मारेगाव वरून चंद्रपूर येथे हलविण्यात आल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत मूळ गावी आणण्यात आले.मात्र दोन दिवसांपूर्वी पुन्हा प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर यवतमाळ येथे हलविले.

यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला.मृतक शेतकरी केशव यांच्या पश्चात आई , पत्नी व दोन मुले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment