– घोंसा मार्गावर नागरिकांची डोकेदुखी
– नगरपंचायतचा दुर्लक्षितपणा कारणीभूत
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव येथील घोंसा रोड वर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खोलगट भाग पडून डबके साचून तलाव सदृश्य स्थिती आहे.मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे कायम दुर्लक्षितपणा नागरिकांसह वाहन धारकांची डोकेदुखी ठरत आहे.साखरझोपेत असलेल्या नगरपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रीत करून निरसन करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
घोंसा रोड च्या ऐन सुरुवातीलाच प्रवेश करतांना रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला आहे.पावसाळ्यात व इतरही ऋतूत हा खड्डा नियमित सांड पाण्याने भरलेला असतो.त्यामुळे व्यवसाय प्रतिष्ठानात कायम डासांचा प्रादुर्भाव आजाराला निमंत्रण देत आहे मात्र याकडे नगरसेवक यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्षही कारणीभूत ठरत असल्याची ओरड आहे.
दरम्यान , या रस्त्याने चार प्रभागाचे नगरसेवक नेहमीच येजा करीत असतांना या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपुर्वक बगल देण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेष म्हणजे या रस्त्याने अनेक ग्राम खेडे असून पादचाऱ्यासह वाहन धारकांचे सातत्य हा रस्त्याचा टंब भरलेला रस्ता डोकेदुखी ठरत आहे.
नगरपंचायत प्रशासन व प्रभागनिहाय लोकप्रतिनिधी विकास कामाची झुल पांघरून या मुख्य रस्त्याकडे सपशेल दुर्लक्षित करीत आहे.या गटारगंगेची तात्काळ वाट लावावी अन्यथा नगरपंचायत प्रशासनासमोर उपोषण च्या माध्यमातून निर्णय लावू असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.