Breaking News

नैसर्गिक संकट… वीज कोसळून शेतकरी महिला जागीच गतप्राण

– पती , एक मजूर व पशुधन थोडक्यात बचावले
– गोरज शिवारातील घटना

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

पाऊस , वादळीवारा सह विजेचा कडकडाट सुरू असतांना शेतातून बैलबंडीने घरी परतणाऱ्या शेतकरी कुटुंबावर नैसर्गिक संकट येवून वीज कोसळली.यात शेतकरी महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवार दुपारी 2 वाजता च्या दरम्यान मारेगाव तालुक्यातील गोरज फाट्यावर घडली. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

येथील कांबळे कुटुंबियांचे शिवारात शेत असून कपाशी डौलाने उभी असतांना त्यावर रासायनिक खत टाकण्याकरिता सकाळी गेले होते.वातावरणात कमालीचा बदल होत असतांना पती पत्नी बैलबंडीने घराकडे निघाले.अशातच मुसळधार पाऊस आणि विजेचा कडकडाट होवून वीज बैलबंडीत बसलेल्या शेतकरी महिला सुवर्णा संजय कांबळे (32) हिच्या अंगावर कोसळून जागीच गतप्राण झाली.मृतक सुवर्णा यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे.

दरम्यान , पती संजय आणि एका मजुरास व पशुधनास वीज कोसळण्याचा हलका धक्का बसून निपचित पडले.पती , मजूर व पशुधन यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.तूर्तास मजुराचे नाव कळू शकले नाही.या दुर्देवी घटनेने परिसरात पुरती शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment