– मारेगाव पोलिसात प्राध्यापकावर गुन्हा दाखल
– बिअर बार समोरील घटना
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
उच्च शिक्षणाच्या संस्थेत सर्वोच्च शैक्षणिक रँकचे व विद्यार्थी घडविण्यासाठी अध्यापनाचे कार्य करणाऱ्या येथील प्राध्यापकाने तळीरामची झुल पांघरून एका युवकास अश्लील भाषेत शिविगाळ करीत मारहाण केल्याची घटना शनिवारला रात्री 8 वाजताचे सुमारास राज्य महामार्गावरील एका बिअरबार समोर घडली.याप्रकरणी फिर्याद दाखल होताच या बहुचर्चित प्राध्यापकावर मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने नानाविध चर्चेला उधाण आले आहे.
येथील वरिष्ठ महाविद्यालयात अध्यापन करणारे प्रा.नविन शर्मा असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
ते शनिवार ला करणवाडी येथील चौफुलीवर दुचाकीतील पेट्रोल संपल्याने एकास लिफ्ट मागीत मारेगाव येथे आले.राज्य महामार्गावर असलेल्या एका बिअर बार मध्ये त्यांनी सोमरसाचा प्रचंड आस्वाद घेत बाहेर निघाले.फुल्ल तळीरामाच्या आवेशात असतांना त्यांनी अनेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत सैरभैर सुटले. अशातच मागावून आलेला फिर्यादी अजय धेडांगे रा. मारेगाव हा दुसऱ्या एकास मला मोटारसायकलने सोडून देण्याची विनवणी करीत असतांना प्रा.शर्मा यांनी अजय यास अकारण अश्लील भाषेत तोंडसुख घेण्यास सुरुवात केली एवढेच नव्हेतर हाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या शिवीगाळ अन मारहाणीत अजय हा लोखंडी गेटवर कोसळत त्यास इजा झाली.या घटनेची फिर्याद अजय याने पोलिसात दाखल केली असून त्यानुसार प्रा.नविन शर्मा यांचेवर कलम 323 , 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान , अध्यापकामध्ये ज्येष्ठते नुसार प्राध्यापक हे वरीष्ठ असते.त्यांच्या विचारातील सकारात्मकता , आशावाद विध्यार्थ्यांना बळ देतो. जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य आशावाद म्हणून प्राध्यापक यांचेकडे बघितले जाते.उद्याचे आदर्श नागरीक घडविणारे प्राध्यापकच तळीरामाची भूमिका वटवित सार्वजनिक ठिकाणी धांगडधिंगा करीत असेल तर विद्यार्थी नेमके कसे घडेल ? हा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने विशेष चर्चिल्या जात आहे.