-शासन प्रवेश अनुसूचित जमातीतूनच
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव येथील तहसील कार्यालयात तीन महिन्यापूर्वी पदोन्नती होऊन तहसीलदार पदावर आरूढ झालेल्या तहसीलदार उत्तम निलावाड यांची जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केल्याने खळबळ उडाली असून तालुक्यात विविध चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे त्यांचा शासन प्रवेश हा अनुसूचित जमाती प्रवर्गातून झालेला आहे .
मारेगावचे तहसीलदार उत्तम सयाजी निलावाड यांच्या रक्त नातेसंबंधातील दत्तात्रय बळीराम निलावाड यांना तहसीलदार पदावर पदोन्नती देण्यात आली होती. मात्र यांच्याकडे बनावट जात वैधता प्रमाणपत्र असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने पडताळणी समितीने सखोल तपास केला. यामध्ये रक्त नातेसंबंधातील अनेकाकडे बनावट जात वैधता प्रमाणपत्र असल्याचे पडताळणी समितीच्या निदर्शनास आले.
त्या अनुषंगाने आदिवासी विभागाच्या किनवट येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने औरंगाबाद विभागातील बनावट जात वैधता प्रमाणपत्र धारक दत्तात्रय निलावाड यांच्या रक्त नातेसंबंधातील १७ जनांची जात वैधता प्रमाणपत्रे रद्द केले. यात मारेगावचे तहसिलदार याचा सुद्धा समावेश आहे. या प्रकरणात पुढें नेमकी कोणती कार्यवाही होते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागलेले आहे.
सदरचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने प्रदान केले आहे. त्यामुळे सदरची कार्यवाही ही चुकीची आहे. यासंदर्भात आम्ही न्यायालयातचे दार ठोठावले असल्याची माहिती तहसीलदार उत्तम निलावाड यांनी सर्वप्रथम ” विदर्भ टाईम्स” ला दिली.