Breaking News

वागदरा सरपंचाकडून कोलदांडा… वसंतनगर ला सापत्न वागणूक खपवून घेणार नाही

– पंचायत भवनाची इमारत हलविल्यास गंभीर परिणाम : उपसरपंचा सह नागरिकांचा गर्भित इशारा

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

ग्राम पातळीवरील विकास कामे साध्य करण्यासाठी वेगवेगळे शासकीय इमारत मागील 35 वर्षांपासून वसंतनगर येथे डौलाने उभी आहेत. यातच मंजूर झालेली पंचायत भवन इमारत इतरत्र हलविण्याचा सरपंचानी घाट घातला आहे. इमारतीचा रेशो वसंतनगरला कायम ठेवा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागेल असा गर्भित ईशारा उपसरपंच संगीता धर्मेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी प्रशासनासमोर दिला आहे.

मागील 35 वर्षांपासून अस्तित्वात आलेल्या वागदरा ग्रामपंचायत मध्ये गट ग्रा. पं. म्हणून वसंतनगर , कान्हाळगाव व दुर्गाडा संलग्नित आहे.मात्र येथील नागरिकांना ग्राम स्थळावरील कामकाजाचे कार्यालय वसंतनगर येथेच अस्तित्वात आहे.

तूर्तास वसंतनगर येथे पंचायत भवन उभारण्याची योजना अंमलात येत असतांना येथील सरपंच दादाराव ढोबरे यांचा अविर्भाव कमालीचा वाढल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहे.आपल्या हेकेखोर प्रवृत्तीने कारभारी पद पचनी पडत नसल्याने सरपंच विरोधात येथील नागरिकांत संतापाची लाट उसळत आहे.किंबहुना हे भवन वागदरा येथे हलविण्याचा घाट सरपंच यांनी घातला आहे.मात्र ग्राम पातळीवरील जिल्हा परिषद शाळा , पशु चिकित्सालय, ग्राम पंचायत कार्यालय हे आजतागायत वसंतनगर येथे असतांना पंचायत भवन अर्थात प्रशासकीय इमारतीचाही रेशो वसंतनगर येथे कायम ठेवावा अशी आग्रही मागणी नागरिकांची आहे.मात्र सरपंच यांचे अडेलतट्टू धोरणाने हा घाट हाणून पाडण्यासाठी उपसरपंच संगीता जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी प्रशासनास साकडे घातले आहे. सरपंच ढोबरे यांचे पाय खोलात नेण्यासाठी आता येथील नागरिकांनी कंबर कसली आहे.

उपसरपंच राठोड यांच्या नेतृत्वात याबाबतचे निवेदन वरिष्ठांना पाठविण्यात आले असून प्रसंगी आंदोलनाची धग पेटवून न्याय पदरी पाडू असा गर्भित ईशारा वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आल्याने सरपंच यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.नागरिकांच्या ताठर भूमिकेने सर्वांच्या नजरा ‘निर्णया’ कडे खिळल्या आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment