Breaking News

संवेदना… आधार कृषी केंद्राचे संचालक प्रफुल्ल धंदरे यांचे निधन

– 12 दिवसा पासूनची झुंज संपली
– मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथे होणार अंत्यसंस्कार

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव येथील आधार कृषी केंद्राचे संचालक तथा मांगरूळ येथील प्रतिष्ठीत नागरिक प्रफुल्ल गोरखनाथ धंदरे यांचे नागपूर येथे आज रविवार ला सकाळी 8.30 वाजता उपचारादरम्यान निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 40 होते.

मारेगाव येथे आधार कृषी केंद्र असे त्यांचे प्रतिष्ठान होते.ते मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील मूळ निवासी होते.

मागील 12 दिवसा पूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड होवून प्रफुल्ल यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.ते तब्बल दहा दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेत असतांना प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नव्हती.दरम्यान शनिवारला रात्री 11 वाजता त्यांना मेडिकल मध्ये हलविण्यात आले मात्र येथेही उपचाराला प्रतिसाद मिळत नसतांना प्रकृती नाजूक होत आज रविवारला सकाळी 8.30 वाजताचे दरम्यान प्रफुल्ल यांची प्राणज्योत मालविली.

त्यांच्या पश्चात आई वडील , पत्नी निलिमा मुलगी तपश्या व मुलगा शौर्य असा आप्तपरीवार आहे.

आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह मांगरूळ येथे आणण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment