Breaking News

मारेगाव युवकांची समयसूचकता… साडेतीन लाखाच्या गोवंश तस्करीचा पर्दाफाश

– दोघांना अटक : दोघे पसार

– सरोदी बेड्याजवळ कारवाई

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्यातून गोवंश परप्रांतात नेण्याचे प्रकार नविन नाही.असाच एक प्रकार रविवारच्या रात्री मारेगाव तालुक्यातील सरोदी बेड्या जवळ तब्बल साडेतीन लाखाचे 18 पशुधन इतर राज्यात नेण्याच्या तयारीत असतांना मारेगावच्या युवकांना निदर्शनास येताच पोलिसांना पाचारण केले.पोलीस येताच गोवंश सह दोघांना ताब्यात घेवून दोघे पसार झाले.

 

मारेगाव तालुक्यासह परजिल्ह्यातून गोवंश तस्करी व्हाया मारेगाव मार्गे तेलंगणा राज्यात नित्याचीच बनली आहे.यात अनेकांचे हात ओले होतं असल्याचे सर्वश्रुत असतांना मारेगाव मार्डी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सरोदी बेड्याजवळ पशुधनाचा घोळक्यास अतिशय निर्दयपणे मारहाण करीत चौघे नेत असतांना ही बाब मारेगाव येथील युवक निखिल मेहता , अनुप महाकुलकार , विशाल किन्हेकार व रोशन पारखी यांचे निदर्शनास येतास पोलिसांना सूचना केली.

 

पोलीस घटनास्थळी पोहचताच मालकी हक्काच्या कागदपत्रांची विचारपूस करताच गोवंश तस्करीचे बिंग फुटले.आणि तेलंगणा राज्यात नेणाऱ्या साडेतीन लाख रुपये गोवंश तस्करी करणारे उमेश जनार्धन चाफले , शंकर संभा बोजेवार रा.मारेगाव यांना ताब्यात घेवून अटक केली तर यातील नरेश चाफले व मारोती जगताप हे दोघे पसार झाले.यांचेवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

दरम्यान , ही कारवाई उप पोलिस निरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत यांचे मार्गदर्शनात शंकर बोरकर , आनंद आलचेवार , अफजल पठाण , चालक जिड्डेवार यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment