Breaking News

नागपंचमी विशेष… मारेगावचा अवलिया स्नेक बॉय..सोनू गेडाम..!

– शेकडो सापांना दिले जीवनदान

मारेगाव : दीपक डोहणे

साप… दिसला तरी मनाचा उडतो थरकाप.साप दिसताच मनात धडकी भरते.त्याच्या दंशाने आपला जीव जावू शकतो त्यामुळे त्याच्या पासून कोसो दूर राहिलेलेच बरे म्हणत अनेकजण जवळ जाण्याचे धाडस करीत नाही.पण काही जण असे असतात की सरपटणाऱ्या प्राण्यांचा सहवासातच असतात.त्यांनाच सर्पमित्र म्हणून संबोधल्या जाते. किंबहुना त्याची परिसरात घट्ट ओळख होते.

मारेगावात असाच एक अवलिया मागील अनेक वर्षांपासून स्नेकबॉय म्हणून साप निघताच व त्याची माहिती कानावर पडताच स्टिक घेवून पळ काढतो.तो आहे मारेगावचा अवघा 24 वर्षीय सोनू संजय गेडाम.अनेक सापांनी त्याला दंश करून शेकडो सापांना जीवनदान देणाऱ्या सोनूचा “नागपंचमी” सणानिमित्त घेतलेला हा परामर्ष !

विषारी साप समजल्या जाणाऱ्या प्रजातीला हाताळणारा अवलिया सोनू. त्याने बिनविषारी अन विषारी प्राणघातक सापासोबत आजतागायत बिनदिक्कत आणि सहज दोस्ती केली.मागील अनेक वर्षात त्याला दंश ही झाला.मात्र त्याने सापाशी असलेली सलगी सोडली नाही.आजपर्यंत 200 हुन अधिक प्रजातीच्या संरक्षणामध्ये सोनूचा मोलाचा वाटा आहे.जोखीम घेत अनेक सापांना त्याने अधिवासात सोडले आहे.त्याने हे मिशन आजतागायत अविरत ठेवले.

प्रारंभीच्या काळात साप पकडण्यासाठी त्याने कुठेही प्रशिक्षण घेतले नाही.त्याचा निकटवर्तीय स्नेही सर्पमित्र स्वप्नील राऊत यांच्याकडून सोनू ने चार महिन्यात सराव केला.विषारी आणि बिनविषारी सापाबाबत त्याने सोशल मीडियावरूनही अभ्यास केल्याची माहिती ‘विदर्भ टाईम्स’ ला दिली.

सापाला मारून टाकणे याबाबत सोनूला प्रचंड विरोध आहे.त्याने आजपर्यंत कोणत्याही सापाला इजा पोहचविली नाही.इतरांना पोहचवू दिला नाही.हे त्याच्या सर्पमित्र कारकिर्दीचे खरे गमक.

तूर्तास सोनूच्या कुटुंबियांना त्याचे हे कार्य आवडेनासे होत आहे.आता कुटुंबियांचा आदर म्हणून सोनू ने संकल्प केलाय.आयुष्यात मी शेवटचा ‘अजगर’ साप पकडूनच या कार्याचा फुलस्टॉप घेण्याचा विचार कृतीत उतरवित आहे.काही दिवसांपूर्वी त्याने मांगरूळ येथे अजगर पकडून अधिवासाच्या स्वाधीन केले.आणि साप पकडण्याच्या शेवटच्या प्रयत्नात स्नेकबॉय ची ओळख बदलविण्याचा विचार मनाशी बाळगला.यापुढे साप पकडणार नसल्याची माहिती सोनू ने प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलतांना दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment