Breaking News

आत्महत्येची धग…. घटस्फोटीत महिलेने आवळला गळ्याला फास

– मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील घटनेने हळहळ

बोटोणी : जयप्रकाश वनकर

तालुक्यातील बोटोणी येथील घटस्फोटीत महिलेने वडिलांच्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारला सकाळी दहा वाजता उजेडात आली.महिलेच्या या टोकाच्या निर्णयाने बोटोणीत पुरती शोककळा पसरली आहे.

रत्ना वसंतराव वरखेडे (32) असे गळफास घेऊन जीवनयात्रा संपविलेल्या महिलेचे नाव आहे.

त्यांचा आठ वर्षांपूर्वी मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे विवाह झाला होता.संसारवेलीवर एक कळी उमलली असतांना अवघ्या तीन वर्षात घटस्फोट झाला होता.तेव्हापासूनच रत्ना ह्या मानसिकरित्या खचल्या होत्या.

परिणामी , मागील आठ दहा दिवसापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ व मानसिक तानाने त्यांनी आज घरातील एका खोलीत गळ्याला गळफास घेतल्याचा कयास वर्तविला जात आहे. यावेळी तिची आई वेगळ्या खोलीत तर वडील हे शेतात गेले होते.

मृतक रत्ना हिच्या पश्चात सात वर्षीय मुलगी ,आई वडील , चार बहिणी व एक भाऊ आहे.

मारेगाव तालुक्यातील वाढत्या आत्महत्येने तालुक्याला सामाजिक हादरे बसत आहे.प्रशासना सह सामाजिक संघटनेने जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment