Breaking News

डॉ.महेंद्र लोढा यांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर शासन करा

– मारेगाव डॉक्टर असोसिएशनचे प्रशासनाला साकडे

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

समाजमाध्यमावर ज्येष्ठ चिकित्सक डॉ.महेंद्र लोढा यांचा बदनामीकारक मजकूर फिरत असतांना सामाजिक दायित्व स्वीकारून रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांची ही सुनियोजित बदनामी अन्यायकारक आहे.या पोरकटपणाला कायम फुलस्टॉप देऊन यात सहभागी दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे निवेदन मारेगाव तालुका डॉक्टर असोसिएशनने प्रशासनास दिले.

वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर हे नियमित रुग्णांकडे कर्तव्याचा भाग म्हणून डोळसपणे बघतो.अनेकदा रुग्ण हा डॉक्टरांच्या सल्ल्याकडे डोळेझाक करतोय.असाच प्रकार मागील आठवड्यात घडल्याने या प्रकरणी वाजवी पेक्षा अधिकचा उहापोह करून बदनामीचा कट रचण्यात आला.यामुळे डॉक्टरांचे मनोबल खचून याचा खाजगी जीवनावरही विपरीत परिणाम होण्याची संभाव्य शक्यता असते.वास्तवात डॉ.लोढा हे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असतांनाही त्यांचे सामाजिक दायित्वाचा भाग उपविभागात अधोरेखित आहे. नव्हेतर नेहमीच रंजल्या गांजल्यांना मदतीचा हात तत्परतेने समोर येते मात्र काहींनी प्रकरणाचा यथोचित चिंतन न करता बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.हे बिनबुडाचे षडयंत्र तात्काळ थांबविण्यात येऊन सखोल चौकशीदरम्यान दोषींवर योग्य शासन करण्यात यावे यासाठी मारेगाव संघटनेने प्रशासनास साकडे घातले आहे.

तहसील व पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात यावेळी डॉ.सपना केलोडे , डॉ.निर्मलकर , डॉ.मनीष मस्की , डॉ.नितीन पाचभाई , डॉ.हर्षाली आस्वले , डॉ.एकनाथ डाखरे , डॉ.नितीन पाटील ,डॉ.कोटेजा , डॉ.श्रीकांत भगत , डॉ. दर्शना राजूरकर , डॉ.चंद्रकांत झाडे यांचेसह तालुक्यातील बहुसंख्य डॉक्टरांची उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment