– कुंभा येथे शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणी मार्गदर्शन व किटचे वाटप
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी, शेतमजुरांना कृषी विभागामार्फत सुरक्षित फवारणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकरी, शेतमजुरांना सुरक्षित फवारणी किट वाटप करण्यात आले.
कुंभा व परिसरातील शेतकरी, शेतमजुरांना सुरक्षित फवारणी करताना घ्यायची काळजी विषयीचे मार्गदर्शन करण्यात आले. फवारणी करताना संरक्षण कपडे, बूट ,हातमोजे, नाकावरील मास वापरणे, वाऱ्याच्या उलट दिशेने फवारणी करावी ,सकाळी फवारणी करावी ,फवारणी झाल्यावर स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी, ऑरगॅनिक फास्फेट गटाची कीटकनाशके शक्यतोवर फवारणी करू नये, फवारणी झाल्यावर अंगावरील कपडे बदलवावे, बिडी व तंबाखू खाऊ नये ,अशा सूचना करण्यात आल्या.
हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी सुनील निखाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक अक्षय सोनुले ,शामल राऊत यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच गजानन ठाकरे, राजू महाजन, प्रभाकर किनाके ,अंकुश जोगी आदी सह शेतकरी ,शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सजग राहण्याची गरज
शिवारात डौलाने उभे असलेल्या पिकांवर प्रादुर्भाव वाढतो आहे. किंबहुना पिकांची वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांकडून नानाविध प्रकारच्या किटनाशकाची फवारणी केल्या जाते.ही फवारणी करीत असतांना शेतकऱ्यांनी सजग राहून काळजी घेण्याची गरज आहे.परिणामी , ‘विटा’ ने प्रकाशित केलेल्या मारेगाव तालुक्यातील मजरा येथील युवकाच्या फवारणी बाधेने मृत्यू वृत्ताची गांभीर्याने दखल घेत कृषी विभागाने आता तालुक्यात मार्गदर्शन सह किट वाटपाचे तडकाफडकी पावले उचलली आहे