– काँग्रेस पक्षाच्या अनु.जाती विभागाने दिली जबाबदारी
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा अनु.जाती विभागाच्या मारेगाव तालुका अध्यक्षपदी आकाश मनोहर भेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाविद्यालयीन जीवनापासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असतांना भेले यांचा निकटवर्तीय गोतावळा मोठ्या प्रमाणात आहे.राजकीयदृष्टीने ते नियमित जनसेवेची धुरा सांभाळत सर्वसामान्य जनतेसाठी न्यायिक भूमिका सातत्याने वटवित असतात.प्रशासकीय कामातील जनतेचा निवाडा करण्यात त्यांचा हतखंडा आहे.ही बाब हेरून काँग्रेस पक्षाने आकाश भेले यांचेवर तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे.
मारेगाव तालुका काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती विभाग च्या अध्यक्ष पदी आकाश भेले यांची महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचे आदेशाने जिल्हाध्यक्ष महेंद्र कावळे यांनी ही नियुक्ती केली आहे.
आकाश भेले यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.