Breaking News

धक्कादायक… शाळेजवळील अतिक्रमण भोवले.. अर्जुनी येथील उपसरपंच तोडासे अपात्र

– अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाचा आदेश निर्गमित

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील ग्रा.पं.जागेवर अतिक्रमण करीत ऐन जिल्हा परिषद शाळेजवळील राजरोसपणे तंबाखूजन्य पानटपरी थाटून व्यवसाय करणारे उपसरपंच यांची तक्रार करण्यात आल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयाने उपसरपंच सुनिल तोडासे यांना अपात्र केल्याचा आदेश निर्गमित करण्यात आला.या आदेशाने राजकीय वर्तुळात पुरती खळबळ उडाली आहे.

मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील सुनील तोडासे हे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सन 2022 मध्ये निवडून आले होते.त्यानंतर दुसऱ्या नंबरचे गाव कारभारी म्हणून उपसरपंच पदावर आरूढ झाले.

परिणामी , त्यांनी ग्रामपंचायतच्या खुल्या जागेवर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ तंबाखूजन्य पानटपरी लावून खुलेआम व्यवसाय सुरू केला.याबाबतची तक्रार जयदीप लोढे यांनी तालुका प्रशासकीय स्तरावर करीत
प्रकरण थेट अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात पोहचले.

दरम्यान , प्रकरणाच्या अनुषंगाने सबळ पुरावा ग्राह्य धरून उपसरपंच सुनील तोडासे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 (ज 3)तरतुदीनुसार अनहर्ता प्राप्त होत असल्याचा निष्कर्ष काढीत अप्पर जिल्हाधिकारी प्र.की.दुबे यांचे न्यायालयाने अपात्रतेचा आदेश निर्गमित केला आहे.

या महत्वपूर्ण निकालाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधीस शासकीय जागेवर अतिक्रमण करणे चांगलेच भोवल्याची चर्चा जोर धरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment