– मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा )येथील घटना
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव तालुक्यातील हिवरा मजरा येथील 23 वर्षीय युवा शेतकऱ्याचा कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. १ ऑगस्ट च्या रात्रीच्या दरम्यान श्वास घेण्यात अडचण येत असल्यामुळे दवाखान्यात नेत असताना सदर सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली.
।सागर सुधाकर राजूरकर वय २३ वर्ष हिवरा (मजरा)असे युवा शेतकऱ्याचे नाव आहे. सदर युवा शेतकऱ्याचे फेफरवाडा शिवारात गट क्रमांक 23 मध्ये एक हेक्टर ३० आर शेत जमीन आहे. सदर शेत जमीन वडीलाच्या नावे आहे. सध्या तालुक्यात सतत पाऊस पडत असल्याने शेतातील पिकात तन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर पिकांवर किडीचे आक्रमण सुद्धा झाला आहे.
।। अशातच काल १ऑगस्ट रोजी सदर युवा शेतकरी शेतात कीटकनाशकाची फवारणी करीत होता. दिवसभर कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर घरी गेला असता त्याला मळमळ व श्वास घेण्यास अडचण होत असल्याचे त्याने घरच्या मंडळी सांगितले. घरच्या मंडळीने तात्काळ त्याला वनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटतच त्याचा मृत्यू झाला. सदर शेतकऱ्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.