तुटलेल्या ताराच्या स्पर्शाने शेतकऱ्यास विजेचा धक्का

– मोठा अनर्थ टळला : महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

कृषी पंपाला विजपुरवठा करणारी मुख्य लाईन चे मजरा शिवारात तुटलेल्या जिवंत तारांचा शेतकऱ्यास पशुधन चारतांना स्पर्श झाल्याने विजेचा मोठा धक्का बसला. सुदैवाने दूरवर फेकल्या गेल्याने प्राण वाचले. मात्र यामुळे महावितरण वीज कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
तालुक्यातील मार्डी वीज उपकेंद्रतर्गत कृषी पंपाला वीजपुरवठा करणारा केगावं फिडरवरील मुख्य लाईनचे तुटलेले तार मजरा शिवारात शेतात पडलेले आहे. मजरा येथील शेतकरी विजय सदू बोबडे हा स्वतःचे शेतात बैल चारत असताना या जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने मोठा विजेचा धक्का बसला. नशीब बलवत्तर विजेच्या धक्क्याने फेकल्या गेल्याने मोठा अनर्थ टळला.

मागील 10 दिवसापासून विजपुरवठा बंद असल्याने तसेच तुटलेले तार जमिनीवर पडल्याने याबाबत शेतकऱ्यांनी महावितरणकडे लेखी तक्रार सुद्धा केली आहे. महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्याच्या जीवितास हानी पोहचली असती तर जबाबदार कोण ? असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे. जिवीत हानी टळली जरी असली तरी यामुळे महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment