– अखेर अविनाश लांबट सह तालुक्यातील सरपंच , उपसरपंच यांची भाजपात एन्ट्री
– आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेवर विश्वासाची मुहूर्तमेढ
मारेगाव : दीपक डोहणे
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मध्ये जाण्याची रिघ लागली आहे.तालुक्यातील अनेकांनी भाजप वर निष्ठा दाखवित आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केल्याने इतर राजकीय पक्षाचे धाबे दणाणले आहे.
मारेगाव तालुका राजकीयदृष्ट्या उलटफेर करणारा तालुका म्हणून ओळखला जातोय.अनेक घडामोडीत आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची धडपड सर्वच राजकीय पक्षात दिसून येते.पक्षाची घट्ट मोट बांधत असतांना मारेगाव तालुक्यातील प्रामुख्याने ग्रामपंचायत पदाधिकारी यांना गळाला लावीत भाजप ने आता तालुक्यात पक्षाचा विस्तार वाढविला आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा जमघट निर्माण करण्याचा विडा उचलला असून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेवर विश्वासपूर्वक नेतृत्वाची कास धरीत सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा सिंधी येथील उपसरपंच , बाजार समिती संचालक अविनाश लांबट , सेवानिवृत्त पोलीस अधिकारी डोमाजी भादिकर , कोथुर्ला सरपंच श्रीकांत गौरकार , गौराळा माजी उपसरपंच चंद्रकांत धोबे , सिंधी माजी सरपंच प्रदीप डाहुले , सोसायटी सदस्य मनोहर गेडाम , सिंधी उपसरपंच दिलीप आत्राम , ग्रा.पं. सदस्य दिनेश गेडाम , नरेश चौधरी , गणेश खुसपुटे , प्रशांत चौधरी , आशिष खंडाळकर , गोपाल ढाकणे , मुरलीधर बलकी , सुमित जुनघरे , गणेश पांढरे , सचिन गौरकार , संतु तुरणकार , अनिल पारखी , विजय वानखेडे , विनोद चहांदकर यांचेसह तालुक्यातील अनेकांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
स्थानिक विश्राम गृहात रविवारला झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे , जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे , मंगेश देशपांडे , प्रसाद ढवस , प्रशांत नांदे , पवन ढवस , युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनुप महाकुलकार , रवी टोंगे , सुधाकर बोबडे , शशिकांत आंबटकर , नगरसेवक वैभव पवार , राहुल राठोड , वर्षा महाकुलकार , सौ.भादिकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.