नगरसेविकाच्या प्रयत्नाला यश… मारेगावात विकास कामासाठी आणला साडेतीन कोटीचा निधी खेचून

– आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिला विकास निधी
– प्रभागातील विकास साधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध : हर्षा महाकुलकर

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

प्रभागातील जनतेने मला प्रतिनिधित्व देवून जो विश्वास दिला त्याची फलश्रुती म्हणून मी प्रभागातील विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे.त्याचाच एक भाग म्हणून विकास कामे करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या निधीतून तब्बल 2.10 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला.या निधीने प्रभागातील रस्ते , गटारीचे कामे प्रगत होणार आहे.असा दृढ विश्वास व्यक्त करीत नगरपंचायतच्या उपाध्यक्ष हर्षा अनुप महाकुलकर यांनी आमदार महोदयांचे आभार मानले.

मागील अनेक दिवसांपासून नगरपंचायत प्रशासनाच्या तकलादू धोरणाने मारेगाव येथील बहुतांश प्रभागातील विकास खुंटला आहे.नगरपंचायत प्रशासनात ढिम्म कारभार चालवितांना वेळोवेळी विरोधकांना दुजाभाऊ दाखवित प्रभागातील विकासाला खीळ बसविली.ही बाबच अस्वस्थ करीत असतांना आमदार महोदयांना साकडे घातले.त्यांनी यत्किंचितही विलंब न लावता माझ्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला.आणि प्रभाग क्रमांक 15 ला 50 लाख , 16 ला 50 लाख , 3 ला 40 लाख व प्रभाग क्रं.6 ला 2.10 लाख असा 3.5 कोटीचा भरीव निधी उपलब्ध करुन विकासाची कास धरण्याच्या प्रयत्नाला यश मिळवून दिले.

दरम्यान, अतूट विश्वासाने प्रभाग क्रमांक 6 च्या नागरिकांनी मला प्रतिनिधित्व बहाल करून विश्वास दर्शविला त्याला तडा न जाऊ द्यायचा हा माझा पुरेपूर प्रयत्न यापुढेही असेलच यात दुमत नाही. मात्र, आजमितीला आणलेला विकास निधीने प्रभाग सर्वांगसुंदर करण्यावर माझा कायम भर असेल.

प्रभागातील प्रत्येक रस्ते यापुढे काँक्रीटीकरण, डांबरीकरण व अतिरिक्त पाण्याच्या प्रवाहाकरिता गटारीचे नियोजन आहे.आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने निधीची उपलब्धता व त्यातून प्रभागातील सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाची कामे मार्गी लागत अधोरेखित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment