– मारेगाव तालुक्यातील ग्राहकांच्या अतूट विश्वासाचा परिपाक
मारेगाव : दीपक डोहणे
पतसंस्था म्हणून अल्पावधीत विश्वासाला पात्र ठरत विदर्भात शाखेचे जाळे विणत फिनिक्स पक्षासारखी झेप घेणारी मारेगाव येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्था शाखेने अवघ्या दहा महिन्यातच
गोल्ड लोणचे दोन कोटींचे लक्ष गाठले आहे. गरजवंतांना विहित वेळेतच सोने तारण ठेवून क्षणातच ऋण मिळाल्या मुळे रंगनाथ पत संस्थेकडे ग्राहकांचा कमालीचा कल वाढला आहे.
श्री. रंगनाथ स्वामी नागरी सह पत संस्था शाखा मारेगाव च्या माध्यमातून गेल्या एक वर्षा पासून ग्राहकांना सोने तारण ची व्यवस्था अत्यल्प दरात करून दिली आहे.
ग्राहकांचे सोने तारण ठेऊन ऋण पाहिजे असलेल्या ग्राहकांना सहज कर्ज उपलब्ध करून देत आहे. अवघ्या दहा ग्रॅम वर 50000 रुपया पर्यंत चे गोल्ड लोन देत असल्यामुळे ग्राहकांचा कल रंगनाथ स्वामी पतसंस्थे कडे वाढू लागला.
विश्वासाची फलश्रुती म्हणून तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी आपले सोने तारण ठेवून वेळेतच कर्ज उपलब्ध होत असल्याने विविधांगी कामाची व प्रामुख्याने शेतीपयोगासाठीची वाट अवघ्या वेळेत मोकळी होत असल्याने ग्राहकांचा अतूट धागा या निमित्ताने घट्ट विणल्या जात आहे.
या विश्वासहार्ताने ग्राहकात समाधानाची छटा उमटत आहे.संस्थेच्या व्यवसायिक पारदर्शकतेचे महामेरु म्हणून अँड.देविदासजी काळे यांच्या खंबीर नेतृत्वात या पतसंस्थेची घौडदौड नॉनस्टॉप सुरू आहे.यासाठी सर्व संचालकाची सकल भूमिकाही महत्वाची ठरत आहे.हे येथे उल्लेखनीय.