आत्महत्येची धग… युवा शेतकऱ्याचा मृतदेह आढळला शिवारात

– मारेगाव तालुक्यातील जळका येथील शेतकऱ्याने घेतले विष

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

तालुक्यातील जळका येथील युवा शेतकऱ्याने शेतात जाऊन विष प्राशन करीत इहलोकाची यात्रा केली.ही घटना आज गुरुवारला सकाळी उघडकीस आली.

किसन सोमा कासार (35) असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.आईच्या नावे असलेल्या शेतातील काही क्षेत्र तो वहिती करीत होता.यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतांना त्याच्या पत्नीला कर्करोगाने कवेत घेतले.

बेताची परिस्थिती आणि उपचारासाठी लागणारा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने किसन याची मानसिक स्थिती ढासळली आणि यातच त्याने टोकाची भूमिका घेतल्याची माहिती कुटुंबातील नातेवाईकांनी दिली.

परिणामी , किसन हे बुधवारला रात्री शेतात गेला आणि शेतातच विष ग्रहण केले.आज सकाळी आई शेतात गेली असता मुलाचा मृतदेहच दिसल्याने एकच हंबरडा फोडला.मृतक किसन याच्या पश्चात आई ,वडील, आजारी पत्नी व मुलगा मुलगी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment