संवेदना…मनसेचे माजी तालुका अध्यक्ष रमेश सोनूले यांचे निधन

सावंगी मेघे रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

– राजकीय ,सामाजिक चळवळीचा अग्रणी हरविल्याने पंचक्रोशी शोकमग्न

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष रमेश केशवराव सोनूले यांचे दीर्घ आजाराने आज दि.23 जुलै रोजी 3.30 वाजता निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 62 होते.त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजीक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तब्बल 14 वर्ष ते मारेगाव तालुक्याचे नेतृत्व करीत होते.सयंमी अन मवाळ स्वभावाने त्यांनी तालुक्यात मनसेचे बीजे रोवत मोठ्या कार्यकर्त्यांची फळी उभी केली होती.गाव तिथे मनसेची शाखा निर्माण करून मारेगाव तालुक्यातील मनसेचे जाळे विणत विविधांगी लक्षवेधी आंदोलन केले होते.

 

राजकीय चळवळीशी बांधिलकी जपत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोपटे लावून मनसेचा विशाल वृक्ष करण्यात त्यांचा सिहाचा वाटा होता.मधल्या काळात त्यांना रक्ताचा कर्करोगाने ग्रासून स्वेच्छेने पदमुक्त झाले होते.

 

परिणामी या दुर्धर आजाराशी मागील दोन वर्षांपासून संघर्ष करीत असतांना मेघे सावंगी रुग्णालयात आज रविवारला दुपारी ‘रमेशभाऊ’ यांची प्राणज्योत मालविली.

 

त्यांच्या मृत्यूने राजकीय व सामाजिक क्षेत्रात पुरती शोककळा पसरली असून मारेगाव तालुक्यातील नवरगाव ( धरण )येथे उद्या सोमवार ला सकाळी 11 वाजता अखेरचा निरोप (अंत्यसंस्कार) देण्यात येणार आहे.रमेशभाऊ सोनूले यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व एक मुलगी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment