वनोजा देवी व डोल डोंगरगाव येथील अवैध धंदे बंद करा

– नागरिक पोलिस स्टेशनवर धडकले

– महिलांची लक्षणीय उपस्थिती

मार्डी: केशव रिंगोले   

तालुक्यातील वनोजा देवी परिसरात मागील अनेक वर्षापासून अवैध दारु विक्री जोमात सुरू आहे. वारंवार तक्रार करूनही विक्री जोमात आहे. ही अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी यासाठी सबंधित प्रशासनास वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे.मात्र ह्या तक्रारीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

येथील देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो आहे. तसेच जवळपासच्या गावचे तरुण दारूच्या आहारी जाऊन त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. कुटुंबामध्ये कलह निर्माण होत आहे. विदर्भातील प्रसिद्ध अश्या जनमाय कासामाय मंदिर परिसरात हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू असल्यामुळे वानोजा देवी व डोल डोंगरगाव येथील महीला मारेगाव पोलिस स्टेशनवर धडकल्या.    

परिसरात दारु विक्री करणाऱ्या विरोधात कडक शासन करण्यासाठी निवेदन दी.21 जुलै ला पोलिस स्टेशन सह तहसीलदार यांना दिले. सदर निवेदनातून अवैध व्यवसाय कायम स्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी डोल डोंगरगाव येथील सरपंचां शितल येरमे, वनोजा येथील उपसरपंच प्रशांत भंडारी, बेबी पवार,जिजाबाई भोसले, रेखा पवार,शुभांगी पवार ,सोनू भोसले,सुनंदा शेरकुरे,विनोद भोसले,मारोती पवार, चिंतामण भोसले, मुरलीधर तोडासे नरेंद्र गुरणुले, लक्ष्मण भोसले,संतोष पवार, योगेश बोडणे, श्रीहरी लेनगुरे, इंदुताई तोडासे , तानेबाई तेकाम, उषा भोसले, मंगला भोसले, राम लेणगुरे आदी उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment