– दोघे ताब्यात : चौघे पसार
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव तालुक्यात तार , लोखंड चोरणारी टोळी सक्रीय असून भालेवाडी येथील घटनेतील दोन संशायित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील चौघे जन पसार आहे.
मारेगाव येथील भालेवाडी येथे वनविभागा कडून रोपवन चे काम सुरू आहे.या क्षेत्रातील रोपवणाला संरक्षण करण्यासाठी तार कंपाउंडचे काम सुरू असतांना त्यासाठी लागणारे जवळपास 30 हजार रुपयांचे लोखंडी अँगल वर सहा जणांच्या टोळीने बुधवारच्या मध्यरात्री डल्ला मारला.
याबाबतची तक्रार संबंधित कंत्राटदार रोहीत बोलेनवार ,पांढरकवडा यांनी मारेगाव पोलिसात दिली.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून यातील संशायित हुसेन सदानंद आडे (23) रा.बोदाड व शाम महादेव गाथाडे (29) सालेभट्टी यांना अटक केली.यातील चौघे जन पोलिसांच्या रडारवर आहे.
सदर घटनेचा तपास ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे मार्गदर्शनात जमादार आनंद अलचेवार , राजू टेकाम , रजनीकांत पाटील , अफजल पठाण करीत आहे.