पोलिस कर्मचारी… “सिंगम” ला निरोप देतांना अनेकांच्या डोळ्यात अश्रु तरळले

– मानवी कर्तव्याचा ओलावा अन मारेगाव अँटो चालकाकडून भावनिक निरोप 

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

सरकारी कर्मचारी म्हटल्यावर बदली हा पाठशिवणीचा खेळ कायम ठरलेला असतो.मिळालेल्या सेवेच्या कालावधीत गावात केलेले काम , कार्यशैली , दिलेली वागणूक यासारख्या गोष्ठी तुमची बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात. आणि पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी दिला जाणारा सन्मान सोहळा तुमच्या केलेल्या कामाची पावती असते .अशाच एका पोलीस कर्मचारी अर्थात ट्रॉफीक पोलीस सिंगम म्हणून प्रसिद्धीस आलेले नितीन खांदवे यांना बदलीचा निरोप देताना भावुकच नाही तर अनेकांना अश्रू अनावर होऊन पोलीस कर्मचारी पलीकडे जावून माणूसपण जपणारे माणसाचे कर्तव्य येथे अधोरेखित केले.

येथील ट्रॉफीक पोलिस नितीन खांदवे यांच्या दीर्घ कर्तव्यात यवतमाळ येथे बदली झाली आहे.अलीकडेच पोलिस म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा कल वेगळा असतो.मात्र हे मत खोडीत आम्ही प्रशासनापलीकडे जाऊन माणूसपण जपल्याचा प्रत्यय या ट्राफिक पोलिसांनी मारेगावात आणून दिला.

 

शासनाच्या कर्तव्याचा भाग म्हणून वाहतूक दारांची समस्या प्रशासनाच्या नियम व अटीत पुरत्या अडकल्या आहेत.प्रवासी , बेरोजगारी त्यातच मोठ्या प्रमाणातील खाजगी वाहतूकदार जगण्याची कशी पराकाष्ठा करतोय आणि हेच या पोलिसाने हेरून अनेकांना कठीण प्रसंगात धावून जात मदतीची ओघ आणि हात दिला.नव्हेतर ट्रॅफिक पोलीस सोडून माणूसपण जपत अनेकांशी मैत्रीचे घट्ट नाते विणले आणि बदली होईस्तोवर हा धागा उसविणार नाही याची कडेकोड खबरदारी घेतली.

 

स्थानांतरण झाल्याने ज्याचा नजीकचा संबंध येतोय त्यांनी आठवणीचा उजाळा देत सिंगम उर्फ नितीन खांदवे यांचा गौरव केला.या कार्यक्रमात त्यांच्या प्रती आपुलकीचा अंतरंग बहाल करीत अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत भावनिक क्षणाला आठवणीचा संग्रह केला.या छोटेखानी कार्यक्रमात अकील कुरेशी , नवाज शरीफ , बंडू खैरे , विजय खाडे , विनायक जुमनाके , शिवम चांदेकर , अफरोज खान , साहिल जीवने , अदनान खान यांचेसह अनेकांनी पुढाकार घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment